कारण आपणच तर सत्य आहोत. त्यामुळे स्वतःप्रत येण्यासाठी कोणताही मार्ग नाही आणि तेच तर सांख्ययोगाचं म्हणणं आहे जे कृष्णमूर्ती आयुष्यभर सांगत होते : " साधना नव्हे, आकलन "! झेनमध्ये सत्यशोधनाला 'पाथलेस पाथ' म्हटलंय.
पण जेकेंच्या 'दि नोअर बिकम्स द नोन' नि घोटाळा झाला आहे कारण नोअर असा कुणी नाही, जाणता किंवा ज्ञाता कुणीही नाही; फक्त जाणण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे बुद्ध सत्याला शून्य म्हणतो : कुणामध्ये कुणीही नाही हा बोध !