"जगायचंही राहून जाईल आणि मुक्ती तर दूरच राहील."
हे असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडते खरं. कुणी ते मान्य करतं कुणी नाही. कुणी स्वतःला सत्य गवसल्याचा आव आणतात.
काही वेळा सत्याचा शोध घेताना देखिल आयुष्य संपून जाते. आणि हे जेव्हा अगदी शेवटी लक्षात येते, तोवर वेळही निघून गेलेली असते.
समर्थांनी काही सोप्या गोष्टी आचरणात आणल्याने आयुष्य सुकर होते असे म्हणले आहे. सर्वसामान्य व्यवहारज्ञानाच्या गोष्टी. ज्यायोगे काही अप्रिय घटीत टळू शकते इतकेच.