इतकंच माझं म्हणणं आहे, कारण सत्य कायम आहे. नैनं च्छिंदंती शस्त्राणी, नैनं दहती पावकः अशी सत्याची स्थिती आहे. सत्य ही काही प्राप्त करण्याची गोष्ट नाही कारण आपण मुळात सत्यच आहोत !
दासबोध आचरण सुधारण्याची नियमावली आहे. जगताना अशाप्रकारे आचरण चौकटीत बसवता येत नाही, ते उत्सफूर्त असावं लागतं. नाही तर ऐन वेळी 'दासबोधात काय म्हटलंय ? ' असा विचार करावा लागेल. अर्थात, काही तत्त्व मूलभूत आहेत, उदा. खरं बोलणं, प्रामाणिकपणा, लाभलेल्याप्रती कृतज्ञता. पण ती एकतर फार थोडी आहेत आणि लोक आचरणात आणोत किंवा नाही, ती सर्वांना माहिती आहेत.