सत्य हा निर्मार्गी मार्ग आहे कारण स्वतःपाशी येण्याला रस्ता नाही, केवळ बोध हवा. म्हणून तर जेके साधनेच्या विरोधात होते. चालण्याची सुद्धा आवश्यकता नाही तिथे मार्ग कसा असेल ? पण ही उकल करायला जेके प्रश्नांचा निरास प्रतिप्रश्न विचारून करत, ती पद्धत निरुपयोगी ठरली. प्रश्नाचा निरास निर्विवाद उत्तरानं होतो आणि मग निष्प्रश्न असलेल्या स्वरुपाचं आकलन होतं.