जे शस्त्रे तोडिता तुटेना । जें पावके जाळिता जळेना ।
कालविता कालवेना । आपेंकरूनी ॥ 
जें वायोचेनी उडेना । जें पडेना ना झडेना । 
जे घडेना ना दडेना ।  परब्रह्म तें ॥
ज्यासी वर्णचि नसे । जें सर्वाहूनि अनारिसे (विलक्षण) ।
परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥
दिसेना तरी काये जालें । परंतु ते सर्वत्र संचले ।
सूक्ष्मचि कोंदाटले । जेथे तेथे ॥ 

हा सर्व 'नैनं च्छिंदंती शस्त्राणी 'चा अनुवाद आहे. त्यात 'दिसेना तरी काये जालें' हे अयोग्य आहे कारण समोर पाहिल्यास निराकार दिसतो किंवा देह  आणि वस्तू यातलं अंतर पाहण्याचा प्रयत्न केला तरी निराकार दिसतो. 'परंतु ते सर्वत्र संचले' याचा अर्थ आपण आणि सत्य एकच आहोत असा आहे.  सूक्ष्मचि कोंदाटले । जेथे तेथे ॥ हे सुद्धा तितकेसे बरोबर नाही कारण सत्य कोंदटलेले नाही ते असीम आणि मुक्त आहे.