"हा सर्व 'नैनं च्छिंदंती शस्त्राणी 'चा अनुवाद आहे."
गीतेतील हा श्लोक आत्म्याचे वर्णन करतो.  आत्मा आणि परब्रम्हं यांचे अद्वैत असते,  कारण ते सर्व चराचरावर व्यापून राहीलेले आहे. ते निराकार असल्याने चर्मचक्षुंना दिसत नाही.  परंतु  त्याचे अस्तित्व जाणवते. असे म्हणले आहे.  जसे मनुष्य देहात प्राण असतो, तो दिसत नाही,  तसेच. 
ज्याला रंग, रुप, गंध, आकार नाही ते वेगळे कसे ओळखता येईल. आणि ते वेगळे नसतेच . 
कोंदाटले याचा अर्थ कोंडलेले असा नसून सर्वत्र व्यापून राहीले आहे, असा आहे. 
सुक्ष्मची कोंदाटले याचा अर्थ  -- अखिल विश्वाच्या अणु-रेणू मध्ये जे भरून राहीलेले आहे.