'सेल्फ' या शब्दामुळं मला सतत वाटायचं , की मी 'कोणितरी' आहे किंवा 'काहीतरी' आहे किंवा तिथं काहीतरी आहे, देअर ईज समथींग. तुम्ही जर 'नो सेल्फ इज द रिअल सेल्फ' हे सांगितलं नसतं तर मला हे असं कळलंच नसतं. इथं हा जो 'अभाव' फॅक्टर आहे तोच तर सगळ्यात इंपॉर्टंट आहे तोच जर नाही कळाला तर बाकी काही करून काय उपयोग ? ! नंतर एका मुलाखतीत जॉन क्लाइन नं हेच असं सांगितलं वुई आर द ऍबसेन्स ऑफ अवर्सेल्फ़.
हेच कंफुय्जन माझं एकहार्ट च्या 'being' या शब्दानं झालं होतं. फक्त 'असणं' म्हणजे 'कुणीतरी असणं' नव्हे हे कसं कळेल चटकन ? मग शोधत बसणं आलच.
या टेक्नीकॅलीटीज बहूदा कोणीच सांगत नाही. कळालेल्यानं सूधा नुसती ऍब्स्ट्रॅक्ट स्टेटमेंटस मांडली तर काय उपयोग ?