किंबहुना सत्य एकच आहे आणि त्याची मानव निर्मित नांवं फक्त वेगवेगळी आहेत. खरं तर सत्याला नामाभिधानाची आवश्यकताच नाही कारण त्याच्याकडे निर्देशच होऊ शकत नाही. म्हणजे सत्य इतकं सर्वव्यापी आहे की त्या वेगळं काही नाही त्यामुळे निर्देशाचं द्वैत ते दर्शवू शकत नाही.
>ते निराकार असल्याने चर्मचक्षुंना दिसत नाही. परंतु त्याचे अस्तित्व जाणवते. असे म्हणले आहे.जसे मनुष्य देहात प्राण असतो, तो दिसत नाही, तसेच
= निराकार दिसणं हीच तर अध्यात्मिक साधना आहे. ज्ञानेश्वरांनी म्हणूनच म्हटलं आहे की 'अधिक देखणे जरी निरंतर पाहणे, योगीराज विनवणे मन आले ॐ मयी ' थोडक्यात, मनाचा निरास झाल्यावर निराकार दिसतो. अन्यथा नजर आकारावरच खिळलेली असते.
>कोंदाटले याचा अर्थ कोंडलेले असा नसून सर्वत्र व्यापून राहीले आहे, असा आहे.
सुक्ष्मची कोंदाटले याचा अर्थ -- अखिल विश्वाच्या अणु-रेणू मध्ये जे भरून राहीलेले आहे.
= हे बरोबर आहे पण कोंदाटले हा शब्द मर्यादा दर्शक भासतो. तो व्यापकता आणि मुक्ती दर्शवत नाही.