तस्मात, सत्याच्या उद्घोषाला "ग्रंथ कोणता" हे महत्त्वाचं नसून "काय म्हटलंय" ते बिनचूक हवं. अध्यात्मिक लेखनातून साधकाला योग्य मार्ग, दिलासा आणि ग्वाही मिळायला हवी.

१) कुणीही अस्तित्वात नाही अशी स्थिती  अजूनतरी नाहीये. 

> अस्तित्व निर्वैयक्तिक आहे आणि सृष्टी स्वयेच प्रकटली आहे. तिचा निर्माता कुणी नाही. मानवतेचे सगळे धार्मिक झगडे तुझा देव मोठा की माझा या एकमेव निर्बुद्ध वादामुळे ओढवलेले आहेत.

२) सृष्टीचा निर्माता कुणी नाही हे तुमचे मत आहे. जे सर्वमान्य आजही नाही.

> हे माझे मत नाही, तो अनुभव आहे. बुद्धानं या उलगड्याला शून्य म्हटलं आहे. शास्त्रज्ञ सृष्टीनिर्मितीचा उलगडा करण्यात गुंग असतील पण अध्यात्मिकाला त्यात काही रस नाही.

३) युगांचे  वर्णन ही केवळ कविकल्पना आहे असे तुम्ही म्हणता ते त्याला जोडुन येणाऱ्या पुराणकथांमुळे का?  त्या कथा बाजूला ठेवल्यास लक्षात येईल की पृथ्वीचे वय काय आहे याचे मापन करण्यात आलेले आहे, आणि तो काळ देखिल आफाट आहे.

> काल ही मानवी कल्पना आहे. मानव मर्त्य आहे म्हणून तर अमृताचा शोध आहे. एकदा, मृत्यू शरीराला आहे आपल्याला नाही, हे कळलं की काल व्यर्थ होतो. कालमापन ही प्रक्रियेच्या मापनाची सोय आहे. निराकारात काल नाही.

४) परमेश्वर असा कुणीच नाही   ... "  हे तुमचे मत.  समर्थांनी तेच म्हणले आहे.  देवाचे सगुण साकार रूप ही मानवाची निर्मिती आहे.  जे मुळब्रम्ह आहे त्याला स्थळकाळाची बंधने नाहीत. ते अनादी  अनंत आहे यात काहीच दुमत नाही. 

> हे योग्य आहे. 

पण मुळब्रह्म वगैरे प्रकार नाही. एक साधीशी निराकारिता आहे, जे सर्व व्यक्ताचं मुळ रुप आहे. 

५)  ह्या मुद्द्यात तुम्ही दोन परस्पर विरोधी विधाने केली आहे.१. परमेश्वराचे सत्यस्वरूप असे काही नाही. २. स्वरूप एकच आहे. आणि आपल्या सर्वांचे सारखे आहे. 

>   (अ) परमेश्वरच नाही तिथे त्याचं सत्यस्वरुप कुठून येईल ? असा माझा दावा आहे. 
      (ब) स्वरुप एकच आहे म्हणजे निराकार एकच आहे आणि वर म्हटल्याप्रमाणे ते वर म्हटल्याप्रमाणे सर्व व्यक्ताचं मुळ रुप आहे. 
 
वरील दोन विधानात कणमात्र विरोधाभास नाही