अगदी बरोबर. तो प्रतिसाद उपरोधीकपणानेच होता. कारण आता 22 मार्च रोजी जागतिक जल दिन आहे. त्या दिवशी एक कलशात पाच नद्यांचे पाणी घालून, त्या कलशाला एक पालखीत ठेवून त्या पालखीपुढे पारंपरिक पोशाखातील स्त्रिया-पुरुष ढोलकी, झान्झा वगैरे वाजवत, मिरवणूक काढतात. याने ना नदी/ विहिरीतील पाणी वाढते, ना त्याचे प्रदुषण कमी होते. स्थानिक नेते "आपल्या संस्कृतीत नदीला माते समान मानले आहे" वगैरे भाषणे करतात, उपस्थित टाळ्या वाजवितात. (इतर वेळी यांच्या पैकी अनेक जण घरातले निर्माल्य नदीत व कालव्यात टाकत असतात)
कोणत्याही उपक्रमाला फक्त एक उत्सव करून टाकणे ही आपली संस्कृती झाली आहे. म्हणून विचारले की पाय दिनी आणखीन काही वेगळे होते का.