"मी त्यातला नाही" असा स्वर लावणे हे चुकीचे, पण व्हॉट्सअप हा एक भोवरा (vortex) आहे. एकदा त्यात अडकल्यावर सुटका कठीण. म्हणून मी टेक सॅव्ही असून सुद्धा काही वर्षे स्वतःला त्या पासून दूर ठेवले. पण एक प्रोजेक्ट मध्ये असे झाले की अनेक लोक असे होते ज्यांच्या बरोबर मला डॉक, पीडीएफ व एक्सेल फाईल्स देवाण घेवाण करावी लागत असे. पण त्यांना इमेल वापरता येत नव्हती. म्हणून मला अनिच्छेने व्हॉट्सअप घ्यावे लागले. मग मी असे केले, की दोन सिम असलेला फोन घेऊन त्यात व्हॉट्सअप करता वेगळे सिम घातले. हा दुसरा नंबर फक्त त्याच लोकांना मी देतो ज्यांना कामा निमित्त मला व्हॉट्सअप पाठवावे लागतात. त्यांना सक्त ताकीद दिली आहे कि जर मला फालतू फॉरवर्ड पाठवला तर तुम्हाला ब्लॉक कारेन. एकाला ब्लॉक केला. माझा जो नंबर जगजाहीर आहे त्यात व्हॉट्सअप नाही. त्याच प्रमाणे मी कोणताही ग्रुपचा सदस्य नाही. कारण ग्रुप वर काम कमी व वायफळ जास्त, मेसेजेस असतात. पुढच्या मिटिंगची तारीख ठरली की सचिव सगळ्यांना ग्रुप वर मेसेज टाकून काळवितो. मला मात्र वेगळा मेसेज टाकावा लागतो. अश्या प्रकारे मी व्हाट्सअपचे नुकसान टाळून फक्त फायदे घेतो.