व्हॉटस ऍप, संगणक, फेस बुक या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा एकत्र उच्चार बरोबर नाही. संगणक हे तर केवळ एक मशीन आहे. त्याचा वापर तुम्ही काय करता, ते तुमच्या हातात आहे. राहिला, व्हॉटस ऍप आणि फेस बुक. या पैकी व्हॉटस ऍप हे दोन किंवा अनेक व्यक्तीं मध्ये संदेश वाहनाचे एक साधन मात्र आहे. त्या वर पाठविलेले संदेश कोण्या थर्ड पार्टीला वाचता येत नाहीत. हे एसएमएस सारखेच. पण कोणालाही पाठविलेला कोणताही संदेश ती व्यक्ती पुढे त्याचा कसा उपयोग करेल, हे सांगता येत नाही. तुम्ही तुमच्या मित्राला काही सांगितले, व त्याने ते जग जाहीर केले, तर ती त्याची चूक आहे. व्हॉटस ऍप हे मात्र फ्लेक्स बोर्ड सारखे आहे. त्यावर टाकलेली कोणतीही माहीती जगजाहीर होत असते.
तुमच्या घराच्या खिडकीचे तावदान फोडून, मागील पडदा बाजूला सारून त्यातून आत डोकावून पाहणे; व तुम्हीच जर खिडकी सताड उघडी टाकली असेल, तर त्यातून आत डोकावून पाहणे; यात कायदा फरक करतो. पहिली कृती गुन्हा आहे. दुसरी कृती अजिबात गुन्हा नाही. एकादी व्यक्ती जर सहकुटुंब दहा दिवस अमेरिकेला टूर वर जाऊन आली, व आपण बिझिनेस क्लास ने प्रवास केला; अमेरिकेत पंच तारंकित होटेल मध्य राहिलो; लास वेगास येथे जुगारात एक हजार डॉलर खर्च केले; इत्यादी माहीती फोटो सकट तिने स्वतःच फेस बुक वर टाकली; व ती वाचून जर इनकम टॅक्स विभागने काही प्रश्न विचारले, तर त्या करता इनकम टॅक्स विभागा वर माहीती चोरल्याचा आरोप करता येत नाही.
"आम आदमी" ला इतके दिवस व्यक्त होण्याची संधीच नव्हती. वर्तमान पत्रात "लेटर टू एडिटर" सुद्धा छापून येण्याची शक्यता कमीच. आता ती संधी मिळाली आहे, व त्याचा उपयोग कसा व किती करायचा, हा अनुभव अजून यायचा आहे. राजकारणी मंडळींना कोणा समोर काय व किती बोलायचे याचे बाळकडू असते. एक शब्द जरी चुकिचा गेला तरी त्याच गहजब होतो. कितीही काळजी घेतली तरी कधी तरी चूक होतेच. मग, "माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला" वगैरे स्पष्टीकरणे द्यावी लागतात. जे जगाला सांगायची गरज नाही, ते मुळात सांगूच नये, हे सामान्य जनांना अजून समजायचे आहे.