धौतियोग मधील सोनामुखी रक्तातील बी १२ शोषण करते व शौचामधून ते बाहेर पडते हा परिणाम वाढत जातो शिवाय त्यामुळे अधिक अधिक धौतियोग घ्यावे लागते व त्याशिवाय शौच्यास होत नाही म्हणजे ती संवय लागते.असे त्याने सांगितले होते . धौतियोग बंद केल्यावर काही दिवस  बी १२ गोळ्या घेतल्यावर हा दुष्परिणाम दूर झाला.
माझे बंधू एम.. डी. मेडिसीन व डी.एम. नेफ्रॉलॉजी आहेत त्यामुळे आयुर्वेदिक औषधाचा त्यांचा अभ्यास मुळीच नाही केवळ माझ्या दुखण्याशी 
संबंधित चर्चा झाल्यामुळे हा शोध बहुधा आंतरजालावर घेऊन त्याने हा सल्ला दिला असावा.माझ्या लेखात उल्लेखल्याप्रमाणे सर्व औषधांचे सह परिणाम डॉक्टर्सनाही माहीत असतातच असे नाही त्याचमुळे माझ्या सौ. च्या बाबातीत जानुमेटचा दुष्परिणाम माझ्या बंधूंच्या सल्ल्यने घेऊनसुद्धा
तिला भोगावा लागला. नंतर जालावर पाहून त्याला ती गोष्ट कळली ऍलोपथी  औषधांचे परिणाम जसे जालावर सापडतात तसे आयुर्वेदिक औषधांचे सापडत नाहीत. उदा : आता सुखसारक वटी मी घेत आहे ते केवळ त्यात सोनामुखी नाही  हे कळल्यामुळे  पण त्याचा इतर काही परिणाम होत असल्यास कोण जाणे !