२००७ साली माझ्या आईला "क्रोनिक रेनल फेल्युअर" असे निदान झाले. त्या वेळी ती काही आयुर्वेदिक औषधे घेत होती. तिच्या नेफ्रोलोजिस्टनी सर्व आयुर्वेदिक औषधे ताबडतोब बंद करायला सांगितली. कारण त्यात अमूक-तमूक "भस्म" असतात व यां भस्मात "हेवी मेटल्स" असतात, ज्याने रेनल फेल्युअर तीव्र होते. दोन वर्षां पूर्वी माझे एक नातलग, वय फक्त साठ, अगदी उत्तम प्रकृती, फक्त जरा गुडघे दुखीचा त्रास. त्यांनी पुण्यातील एका नामंकित वैद्यांची औषधे घेतली. सहा महिन्यात तो डायलॅसिस वर आला, व वर्षा भरात किडनी फेल्युअर ने गेला. त्याच्या नेफ्रोलॉजिस्ट ने पण तेच सांगितले,  भस्म = हेवी मेटल्स = किडनी फेल्युअर. त्या घटने पासून आमच्या कुटुंबात आयुर्वेद औषधांना बंदी आहे. आयुर्वेदिक म्हणजे सुरक्षित हा एक निव्वळ भ्रम आहे. आयुर्वेदात काही उपयोगी गोष्टी असतील. पण गोची अशी आहे कि, वैद्यांना फक्त औषधी वनस्पतींची नांवे माहीत असतात. पण त्यातील  ऍक्टिव घटक काय असतात हे खुद्द वैद्यांना पण ठाऊक नसते. त्या मुळे गुडघे दुखी दूर करतना आपण किडनी फेल्युअरला आमंत्रण देत आहोत, हे त्यांनाच माहीत नसते. जो पर्यंत आयुर्वेद वात-पित्त-कफ याच्या बाहेर येत नाही, तो पर्यंत त्या पासून दूर राहिलेलेच बरे.