एकदा का नियमित तपासण्यांची सवय लागली की कायमचा परीक्षा आणि निकाल असा धसका जीवनात सुरू झालाच म्हणून समजा.
शरीराचं आणि आपलं नातं हे कारसारखं आहे. आपण कारमध्ये बसून हिंडतो-फिरतो पण स्वतःला कार समजत नाही.
तद्वत, शरीरात काही बिघाड वाटला तर त्याची त्या वेळी योग्य देखभाल आवश्यक आहे आणि त्याबाबतीत कोणत्याही वैद्यकीय चाचणीपेक्षा आपली संवेदना सर्वात निकटतम आणि योग्य निर्देशक आहे.