एका तज्ञ डॉक्टरने तर हदयावरील कोणतीच ( म्हणजे ध. रो. मु. आणि बायपास
सुद्धा ) शस्त्रक्रिया आवश्यक नसते असे ठामपणे बजावून रोग्याला त्या
शस्त्रक्रियेनंतर बरे वाटणे हा केवळ प्लासिबो परिणाम म्हणजे . . . .
तो व्हीडीयो मी पण बघितला आहे. या महाशयांना तसेच माधवबागवाल्यांना, हृदयरोग होऊ नये. पण झाल्यास ते काय करतात, मुकाट्याने शस्त्रक्रिया करून घेतात, का आपल्या मतांशी ठाम राहून शस्त्रक्रियेस नकार देतात, या बाबत मला उत्सुकता आहे. काही वर्षांपूर्वी एका सायन्स जर्नल मध्ये एक लेख होता, (किंवदंती नव्हे. सायन्स जर्नल मध्ये लेख) मुंबईच्या हफकीन इन्स्टीट्यूट मधल्या एका सर्प तज्ञाचा. तिथे सापांचे विष काढून त्यापासून विषप्रतिबंधक लस बनवितात. त्याच्या कडे एक गारुडी आला, व म्हणाला कि या गारुड्याच्या पारंपारिक व्यवसायातून पोट तर भरत नाही, तर तुमच्या कडे जागा असल्यास नोकरी हवी आहे. हफकीन इन्स्टीट्यूटला सर्प हाताळण्याचा अनुभव असलेल्यांची गरज असतेच. एका जुजबी इंटरव्यू नंतर त्याला नोकरी मिळाली. त्याच्या इंटर्व्यूत असे लक्षात आले कि त्याला फक्त "नाग" प्रजातीचेच सर्प हाताळता येतात, व "रसेल्स वायपर" या प्रजातीचे सर्प हाताळण्याचा त्याला अजिबात अनुभव नाही. म्हणूंन त्याला ताकीद देण्यात आली कि तू फक्त "नाग" विभागातच काम करायचे. "रसेल्स वायपर" हा एकदम वेगळ्या प्रकारचा साप आहे, त्याची चपळाई, झडप घालण्याची लकब, एकदम वेगळी आहे, व म्हणून तू "रसेल्स वायपर" च्या जवळ जाऊ नकोस. हा कामगार नेहमी बढाया मारत असे, कि आम्हा गारुड्यांना सापाचे भय नसते, आमच्या कडे सर्प विषा वर उतारा म्हणून अनेक वनौषधी असतात, मंत्र असतात, वगैरे, वगैरे.
त्याचे कुतुहल त्याला स्वस्थ बसू देईना, व एक दिवस त्याने "रसेल्स वायपर" ची पेटी उघडून त्याला धरण्याचा प्रयत्न केला. ते टेकनीक त्याला अवगत नव्हते, व "रसेल्स वायपर" त्याला चावला. त्याने लगेच या वैज्ञानिक लेखकाकडे येवून सांगितले, कि मला "रसेल्स वायपर" चावला. लेखक पुढे सांगतात - मी त्याला सांगितले कि तुला फक्त पाच मिनिटे अवधी देतो, पाच मिनिटात सांग कि तुला माज्या कडून इंजेक्शन हवे, का तू आपली वनौषधे घेणार. त्याने पाच सेकंद पण विचार न करता सांगितले, कि मला इंजेक्शनच द्या.