धन्यवाद चेतन !
माझा मनोगतवर लिहिण्याचा उद्देश हाही असतो की आपला अनुभव इतरांना उपयोगी पडावा !
असाच दुसरा एक अनुभव माझ्या डॉ.बधूंनी सांगितलेला. एक रुग्ण जो पूर्वी त्याच्याकडे कधीच आला नव्हता येऊन आपल्या ह्रदयाविषयी तक्रार करत पुढे असेही म्हणाला , " डॉक्टरसाहेब, डॉ. ******* म्हणतात की आठ दिवसाच्या आत बायपास केली तर ठीक आहे नाहीतर काही खरं नाही" माझ्या भावाने व्यवस्थित तपासणी करून त्याला सांगितले, "मला काही तसा धोका दिसत नाही. " यावर तो पुन्हा त्याच्या डॉक्टरचे मत सांगू लागला, त्यावर भावाने त्याच डॉक्टरकडे जाण्यास सांगितले पण त्याचबरोबर तो हेही म्हणाला," आठ दिवसाच्या आत असे सांगितले आहे तर आठ दिवस मी जे औषध देतो ते घ्या तोपर्यंत तरी तुम्हाला काही होणार नाही त्यानंतरही बरे वाटले नाही त्याना बायपास करायची असेल आणि तुम्हाला करून घ्यायची असेल तर त्यांच्याकडे अवश्य जा. "
भावाने आठ दिवस औषध दिले आणि तो रुग्ण पूर्ण बरा झाला. शस्रक्रिया करावीच लागली नाही.