"समर्थ म्हणतात, आम्ही श्रीरामचंद्रांच्या कुळातले, त्याचेच सेवक. तो सर्वश्रेष्ठ आणि समर्थ हे जगन्मान्य सत्य. त्याची सेवा यथायोग्य घडावी म्हणून तर सारी ज्ञानोपासना केली. जर त्याच्या सेवेमध्ये आम्ही काही अनमान केला, तर आमचे पतन होईल. गुरू जे सांगतात ते सारे पूर्ण विचाराअंतीच असते.  त्यांस अविचार म्हणणे हे अयोग्य नाही का?  सद्गुरूंचे  सांगणे  जो मानणार नाही, त्याचे प्रारब्ध तितकेसे उज्ज्वल नसणार हे तर नक्कीच -- असे करणारा  कुणीही असो. सामान्य असेल तर दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडेल, आणि राजपदावर असेल तर स्थानभ्रष्ट होईल".

राम माहिती असणारे भारत सोडता जगात लोक किती ? त्यांनी रामाची सेवा केली नाही म्हणून त्या सर्वांच पतन झालं आहे का? उलट पाश्चिमात्य देश आपल्यापेक्षा किती तरी प्रगत आहेत. त्यांचं प्रारब्ध ही भन्नाट आहे, सध्या तरी भारतीयच दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेले दिसतात, आणि ट्रंप तर सुखनैव राजपद भोगत आहेत ! याची काय कारणमिमांसा असू शकते ?