आपल्याला सोयीस्कर ते आणि तेव्हढेच नैतिक, असे समजण्याच्या काळात असा प्रश्न मनात येणे सुसंगतच आहे. 

श्रीरामाची उपासना म्हणजे पूजापाठ, भजन, कीर्तन  एव्हढेच अभिप्रेत नाही. 
श्रीरामांनी चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आदर्श वर्तणूकीचा आदर्शच दिला.  तो सुद्धा बोलून अथवा उपदेश करून नव्हे,  तर स्वतःच्या आचरणातून.  
जे चांगले आहे, आदर्श आहे त्याचे अनुकरण केल्याने फायदाच होतो. एका व्यक्तीचा आणि त्या योगे संपूर्ण समाजाचा. 
जे वाईट आहे ते कधीच टिकाउ नसते.   काही काळा पुरता त्याचा गवगवा होतो. नंतर त्याचे पतन होते. ( उदाहरणे खूप देता येतील, पण मग हे उत्तर फारच लांबेल ). जे शुद्ध, पवित्र आणि आदर्श आहे, तेच शाश्वत आहे.  यात दुमत असायचे कारण नाही. 
समर्थांनी सांगितले  की तुम्ही रामासारखे व्हायचा  प्रयत्न करा.  मग तुमचे कल्याण होईल . 
यात वावगे काहीच दिसत नाही.