"समर्थांनी सांगितले की तुम्ही रामासारखे व्हायचा प्रयत्न करा. मग तुमचे कल्याण होईल " हे कशाला ?
"कुणासारखं" व्हायचा प्रश्नच नाही. "कुणासारखं व्हायचा प्रयत्नच" तर स्वरुपापासून दूर नेतो. "कुणी तरी आहोत" असं वाटणंच तर द्वैत आहे. आणि व्यक्तिमत्व हाच अहंकार आहे, मग ते कितीही उदात्त असो. समर्थांना जर उलगडा झाला असेल तर त्यांनी असं कसं सांगितलं ?
आधीचे लेख वाचूनच प्रतिसाद लिहीला आहे. जर समर्थ फक्त भक्तीबद्दल बोलले असते तर मला लेखमालेत काडीमात्रही रस नव्हता कारण भक्ती नवनवे भ्रम निर्माण करते आणि नुसता कालापव्यय होतो.
निराकार म्हणजे राम नव्हे.