१) सत्याचा उलगडा झालेला स्वछंद जगतो. स्वछंद जगणं हे रामाच्या समाजमान्य जगण्यापेक्षा जास्त मुक्त आणि आनंदाचं आहे. कारण सामाजिक धारणा कालपरत्वे बदलत असतात. उदा. रामानं सीतेला अग्निदिव्य करायला लावलं आणि पुढे तीचा त्याग केला हे आजच्या स्त्रीला मान्य होणार नाही आणि तिच्या दृष्टीनं राम आदर्श असणार नाही.
२) स्वरुपाचा उलगडा झाला की जग मिथ्या वगैरे होत नाही तर जगणं आनंदाचं होतं.
३) "समर्थ म्हणतात, आम्ही श्रीरामचंद्रांच्या कुळातले, त्याचेच सेवक. तो सर्वश्रेष्ठ आणि समर्थ हे जगन्मान्य सत्य. त्याची सेवा यथायोग्य घडावी म्हणून तर सारी ज्ञानोपासना केली. जर त्याच्या सेवेमध्ये आम्ही काही अनमान केला, तर आमचे पतन होईल. गुरू जे सांगतात ते सारे पूर्ण विचाराअंतीच असते. त्यांस अविचार म्हणणे हे अयोग्य नाही का? सद्गुरूंचे सांगणे जो मानणार नाही, त्याचे प्रारब्ध तितकेसे उज्ज्वल नसणार हे तर नक्कीच -- असे करणारा कुणीही असो. सामान्य असेल तर दुर्दैवाच्या फेर्यात सापडेल, आणि राजपदावर असेल तर स्थानभ्रष्ट होईल".
या विधानांना हरकत आहे. स्वछंद जगणाऱ्याला प्रारब्ध वगैरे काही राहात नाही कारण प्रारब्ध हे व्यक्तीमत्त्वाचं बंधन आहे. एकतर समर्थांना स्वरुपाचा नीटसा उलगडा झालेला दिसत नाही. किंवा रामभक्तीनं तो होईल या आशेवर त्यांनी ग्रंथलेखन केलं असावं. तिसरी काही शक्यताच नाही.