सत्याचा उलगडा झाल्याने वर्तन सुधारते अथवा बदलते,  असे होतेच असे नाही. परंतु ज्ञानप्राप्तीनंतर  अखिल विश्वामध्ये आपले स्थान कोणते?  याचे आकलन होते.  जन्ममृत्युचे भय नाहीसे होते. 

स्वच्छंदी  जगण्याबद्दल, __  तर हा  शब्दच पुरेसा बोलका आहे . स्वताच्या छंदात रमणारा . प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो. "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती"  असे म्हणतात. त्यामूळे कुणाला कसे जगणे आनंदाचे वाटेल,  याचे एकच एक परिमाण देता येत नाही. 
तसेच प्रपंच, संसार करणाऱ्यांना स्वतः सोबत इतर अनेकांची जबाबदारी असते.  ती यथायोग्य निभवता यावी याकरीताकाही एक चौकटीत  जगणे आवश्यक  आणि हिताचे असते, व्यक्तीच्या आणि समाजाच्या देखिल. 
 मनमुक्त जगणे अशक्य नसते, परंतु प्रत्येक जण आपल्या समजुतीने मार्ग निवडतो.  

श्रीराम हे सर्वसामान्य व्यक्ती नव्हते तर राजे देखिल होते.   त्यामुळे त्यांच्या कृतीला सर्वसामान्यांचे निकष लावणे योग्य नाही. 

तुमचा तिसरा मुद्दा -- 
ज्याच्याकडे सामान्यज्ञान असेल अशा व्यक्तीला हे सहजच समजेल, की विशिष्ठ पद्धतीने जीवन जगले तर ज्ञान, यश आणि धन प्राप्त होऊ शकते. 
त्या करता सद्गुरूंचे मार्गदर्शन जरूरी असते.  स्वयंभू असा कुणीच नसतो. त्यामुळे गुरुआज्ञेचे पालन करावे, असे सांगण्यात मला कोणताच अविचार दिसत नाही. 

"समर्थांना स्वरूपाचा  .......... "  असे म्हणणे अहंकाराचे द्योतक आहे.