तुमच्या लेखनात तॄटी जाणवतात :
१) परंतु ज्ञानप्राप्तीनंतर अखिल विश्वामध्ये आपले स्थान कोणते? याचे आकलन होते.
ज्ञानप्राप्ती म्हणजे आपण कुणीही नाही आणि कुठेही नाही (शून्य) किंवा आपणच सर्वत्र आहोत (पूर्ण) हा उलगडा. अखिल विश्वामध्ये आपलं स्थान वगैरेचा प्रश्नच नाही.
२) व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" असे म्हणतात. त्यामूळे कुणाला कसे जगणे आनंदाचे वाटेल, याचे एकच एक परिमाण देता येत नाही.
तसेच प्रपंच, संसार करणाऱ्यांना स्वतः सोबत इतर अनेकांची जबाबदारी असते.
ज्ञानप्राप्ती म्हणजे सर्व सृष्टीच चालवते आहे हा उलगडा; त्यामुळे प्रपंच, इतरांची जवाबदारी असे व्यक्तिगत प्रश्न उरत नाहीत.
३) श्रीराम हे सर्वसामान्य व्यक्ती नव्हते तर राजे देखिल होते. त्यामुळे त्यांच्या कृतीला सर्वसामान्यांचे निकष लावणे योग्य नाही.
रामकथा वाल्मिकींनी लिहीली आहे, त्यामुळे तो त्यांच्या स्वतःच्या पूर्वायुष्यातल्या (वाल्या कोळी) घडामोडींच्या पूर्णपणे विरुद्ध व्यक्तिमत्व (आदर्श आणि सदगुणी व्यक्ती) निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कथेतील एकूण चमत्कार बघता ती काल्पनिक असण्याची शक्यता आहे. तस्मात, असं व्यक्तिमत्व असणं हा वाल्मिकींचा ध्यास असू शकतो, सामान्यांनी पूर्वायुष्यात इतके अपराध किंवा गुन्हे केलेले नसतात त्यामुळे त्यांना इतक्या प्रमाणात आदर्श होण्याची गरज नसते.
४) विशिष्ठ पद्धतीने जीवन जगले तर ज्ञान, यश आणि धन प्राप्त होऊ शकते.
प्रश्न सत्यप्राप्तीचा आहे !
५) "समर्थांना स्वरूपाचा .......... " असे म्हणणे अहंकाराचे द्योतक आहे.
सत्य सर्वत्र, सर्व काल आणि अबाधित आहे, ते आपल्या सर्वांचं, काही केल्याविना स्वरुप आहे, तस्मात रामभक्ती आणि सत्योपलब्धीचा काही एक संबंध नाही. रामभक्तीनं काही प्रमाणात आचरण सुधारू शकेल पण व्यक्तीत्वापासून मुक्तता असंभव आहे. कारण सुधारलेल्या व्यक्तीमत्वाचा नवा लोभ जडतो (यालाच अहंकार म्हणतात! ) . जर समर्थांना याची कल्पना दिसत नाही म्हटलं तर तो अहंकार असू शकत नाही.