अशी दुरुस्ती हवी. पण शेवटी गुरू निवडतो कोण? आपणच ना ?

त्यामुळे अध्यात्माचं सर्वप्रथम सूत्र आहे की स्वतःच्या प्रत्येक निर्णयाची जवाबदारी स्वतःची आहे. मग ती गुरुची निवड असो, साधनेची पद्धत असो की स्वतःच्या अध्यात्मिक वाटचालीतली प्रगती असो.

एक फार महत्त्वाचं सूत्र सांगतो : आपल्याला साक्षात्कार झाला किंवा नाही याचा एकमेव पुरावा म्हणजे साधकाची स्वतःची खात्री आहे. जोपर्यंत साधक गुरुच्या हवाल्याच्या प्रतीक्षेत आहे तोपर्यंत तो स्वतंत्र नाही, त्या हवाल्याच्या बंधनात आहे. याचा अर्थ योग्य गुरुच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञ नसतो असं नाही. त्याला गुरुविषयी कृतज्ञता निश्चीत असते पण तो गुरुवर अवलंबून राहात नाही. 

कारण त्याला एकच उलगडा होतो : गुरू ही नाही आणि आपण नाही, जे काय आहे ते एकच आहे आणि आपण त्याहून वेगळे होऊच शकत नाही !