बिग बॉस कार्यक्रमात राजेश शृंगारपुरेने रेशम टिपणीसबरोबर अतिरिक्त मोकळेपणा दाखवला.  महेश मांजरेकरांनी त्यासंदर्भात . . . .

मी बिग बॉस बघत नाही. (खर तर मी कोणतीच मालिका बघत नाही). म्हणून कोण हा राजेश, कोण ही रेशम,  आणि त्याने रेशम बरोबर अतिरिक्त मोकळेपणा दाखवला म्हणजे नेमके काय केले, इत्यादी मला ठाउक नाही. (व जाणून घेण्याची इच्छा पण नाही). पण माझी खात्री आहे, कि जे काही घडले, ते सगळे "फिक्स्ड" होते. ही खात्री असण्याचा पाया असा कि,  तिने त्या करता त्याच्या थोबाडीत नाही दिली. तो "अतिरिक्त मोकळेपणा" खपवून घेतला. जर ते असभ्य होते, दाखाविण्याच्या लायकीचे नव्हते, तर शूटिंगचे एडिटिंग करताना तो भाग कापून टाकता आला असता. का नाही कापला?  आणि मांजरेकरांनी विडीयो एडिटरला का नाही हाकलून दिले?

तर, सगळे फिक्स्ड होते. कारण हेच (असणार) कि या मालिकेची दर्शक संख्या कमी होत चालली होती, व ती वाढविण्या करता त्यांना काही तरी "झणझणीत" करणे भाग होते.  एका पुरुष पात्राने एका स्त्री पात्रा बरोबर अतिरिक्त मोकळेपणा दाखवला,  वगैरे बातमी पसरली, कि "अच्छा, इथे असे काही तरी पाहायला मिळते होय", असा विचार करून त्यांची दर्शक संख्या वाढेल. समाजाचे म्हणाल तर जवळीक, मारामारी, अद्वातद्वा बोलणे, संगनमत हे पाहण्या करता टीवी लावून त्या समोर बसावे लागते, हे भलतेच काही तरी.