राजेश - रेशम मधला मोकळेपणा स्क्रिप्टेड किंवा फिक्स्ड वाटत नाही. कारण अनिल थत्ते बाहेर आल्यावर एका मुलाखतीत म्हणाले होते "आता एक गौप्यस्फोट करतो. रेशमचा घटस्फोट झाला आहे आणि राजेशचा फक्त कागदोपत्री व्हायचा बाकी आहे. हे दोघे बिग बॉसमध्ये यायच्या आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहेत". ज्या प्रकारचा मोकळेपणा दोघांमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून दिसत होता त्यावरून हे खरे असावे असे वाटते. कारण अनोळखी किंवा कमी ओळखीच्या दोन व्यक्तींमध्ये इतका मोकळेपणा निर्माण व्हायला काही अवधी जावा लागतो, पण इथे पहिल्याच दिवसापासून
हे सर्व सुरू आहे. बिग बॉसनेही चॅनेलचा टीआरपी वाढतो आहे म्हणून खपवून घेतले/ उत्तेजन दिले. इतकेच नव्हे तर प्रेक्षकांनी राजेशला बाहेर काढल्यावरही एक आठवडा अज्ञातवासात ठेवून परत घरात आणले. पुढे पोलिसात तक्रार झाल्यावर बिग बॉसने तातडीने राजेशची हकालपट्टी केली.
विनायक