बिग बॉसनेही चॅनेलचा टीआरपी वाढतो आहे म्हणून खपवून घेतले/ उत्तेजन दिले.
एक्झक्टली. फिक्स्ड म्हणजे त्यांच्यातला मोकळेपणा स्क्रिप्टेड होता असे नव्हे. ते पण असू शकते, पण मला असे म्हणायचे होते, कि आधी त्यांना जरा जादाच मोकळेपणा (खरा वा खोटा) करू द्यायचा; तो एडिट न करता दाखवायचा; प्रेक्षकांनी आधी ते मिटक्या मारीत बघायचे, व्यवस्थीत बघून झाल्या नंतर मग हे दाखविणे फारच वाईट असा दांभिक आव आणायचा, त्या करता कोण तो राजेश त्याला बाहेर काढायचे; हे सगळे नाटकच. म्हणून फिक्स्ड. ज्यांनी तो मोकळेपणा पाहिला आहे त्यांनी सांगावे - घडत असलेली घटना त्या घटनेत भाग न घेता  चित्रांकित केल्या सारखे होते (जशी क्रिकेट मॅच) का मेक-अप/ टेक-रिटेक करून घडवून आणल्या सारखे "फ्लॉ-लेस" होते? आणि तिचा घटस्फोट झालाच होता, त्याचा होण्यात आहे, दोघे आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहेत, . . . हे सगळे काय दिग्दर्शक/ प्रोड्यूसर यांना माहीत नव्हते? अशक्य.