> समर्थ अशा लोकांना वारंवार सांगताहेत,  या भासमान सृष्टीत जे  तुमच्या चर्मचक्षूंना दिसते आहे, ते सर्व मिथ्या आहे, भ्रम आहे. 

= ज्याप्रमाणे डोळ्यांना आकार (सृष्टी) दिसतो त्याप्रमाणे निराकारही ( ब्रह्म) दिसू शकतो. फक्त नजरेचं रुपांतरण आवश्यक आहे. त्याला गेस्टाल्ट बदलणं म्हणतात.  

जे सध्या दिसतंय तो भ्रम आहे असा दृष्टीकोन साधकाला  भ्रमिष्ट करेल. 

तस्मात, पडदाच खरा आणि चित्रपट भ्रम हा दृष्टीकोन  चुकीचा आहे. पडदा शाश्वत आहे पण सृष्टीची खुमारी तिच्या नश्वरतेत आहे. जर तरुणी वृद्ध झालीच नाही तर तिच्या तारुण्याला काय अर्थ आहे ?

> जे शाश्वत सत्य आहे, त्याचे स्वरूप जाणले असता  सारा वृथा अभिमान गळून जाईल. 

=  शाश्वताला जाणण्यानं जग चित्रपटासम भासतं आणि जगण्याची मजा येते. 


> जे दिसते तेच सत्य आहे असे मानू नका, कारण असे करणे शहाणपणाचे लक्षण नव्हे. 

= जे दिसतं  ते लोभस आहेच पण जे दिसायला दुर्लभ आहे ते पाहणं ही खरी साधना आहे.

तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे आणि तो माहिती जमा करणाऱ्यांना निश्चित भावेल पण सत्य उमगायला उपयोगी वाटत नाही.