माझी लेखमाला फारशी वळणदार नाही ...... सरळमार्गी आहे. 
तिचा मार्ग, तिची दिशा सारे काही ठरलेले आहे.  त्यात काही बदल घडणे  असंभव. 
पण तुम्हाला त्यातून काही उमजेल का?   या बद्दल साशंकता आहे. 
स्वतःला काय वाटते ते लिहून काढणे तसे सोपे आणि सहजसाध्य आहे. 
परंतु दुसऱ्या कुणाचे लेखन  नीट वाचून, समजून घेणे आणि त्यावर त्या लेखनाला सुसंगत अशी प्रतिक्रिया लिहिणे,  काहीसे अवघड आहे. 
अर्थात प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर ते तुम्हालाही  जमेल, नाही असे नाही. 
असो,
तर माझ्या पुढच्या लेखावर तुम्ही काय लिहाल याची कल्पना असल्याने फारशी उत्सुकता नाही.