याला अनुवाद म्हणतात. ते लिहीणाऱ्याला समजेलं सत्य नाही. अध्यात्मात आतापर्यंत अनेक लोक अशा कामात वेळ घालवत आले आहेत.

माझे इथे जवळपास ७० लेखप्रकाशित आहेत, जे अध्यात्माचा स्वतंत्र उहापोह करतात आणि ते कशाचाही अनुवाद किंवा निरुपण नाहीत. 

देव ही निव्वळ मानवी कल्पना आहे, तिला काडीचा आधार नाही. तस्मात भक्तीमार्ग हा  करमणूक म्हणून ठीक आहे आणि लेखमालेवरचे माझे प्रतिसाद तेच सांगण्याचा प्रयत्न आहे.

शिवाय व्यक्तिमत्व म्हणजेच अहंकार या माझ्या विधानाचा लेखमालेत प्रतिवाद झालेला नाही. त्यामुळे व्यक्तिमत्व सुधारून सत्य गवसेल हा दासबोधात सांगितलेला मार्ग फोल आहे. त्यावर तुम्ही  कधी विचार केला आहे  का ? 

आंतरजालावरचं लेखन हे संवादात्मक  असतं. एकतर्फी लेखन हा आत्मसंवाद असतो आणि ते डायरी सदृश असतं. त्यासाठी आंतरजालाचा वापर योग्य नाही असं  वाटतं.