इथे तुम्ही आणि लेखिका यांच्यात मला पडायची इच्छा नव्हती पण येणाऱ्या प्रत्येक भागावर तुम्ही निरर्थक, रसभंग करणारे खुस्पटे/आक्षेप काढत आहात म्हणून हा प्रपंच.

याला अनुवाद म्हणतात. ते लिहीणार्‍याला समजेलं सत्य नाही. अध्यात्मात आतापर्यंत अनेक लोक अशा कामात वेळ घालवत आले आहेत.

इथे नुसता अनुवाद नाही. लेखिकेने स्वतःचे भाष्य/स्पष्टीकरण/निरूपण केले आहे ते उत्तम झाले आहे असे मला वाटते. माझ्यासारखे अनेक असतील, ज्यांना वाचायचे आहे, त्यांना आपला वेळ वाया गेला असे वाटत नाही. 

माझे इथे जवळपास ७० लेखप्रकाशित आहेत, जे अध्यात्माचा स्वतंत्र उहापोह करतात आणि ते कशाचाही अनुवाद किंवा निरुपण नाहीत.

याचे कारण म्हणजे तुम्ही जुने ग्रंथ वाचलेले नाहीत असे मला वाटते. तुम्ही ज्याला स्वतःचे तत्त्वज्ञान म्हणता तेच उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे, ज्ञानेश्वरी , अमृतानुभव अश्या ग्रंथांमधून आधीच आणि (तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने) सांगितले आहे.

देव ही निव्वळ मानवी कल्पना आहे, तिला काडीचा आधार नाही. तस्मात भक्तीमार्ग हा  करमणूक म्हणून ठीक आहे आणि लेखमालेवरचे माझे प्रतिसाद तेच सांगण्याचा प्रयत्न आहे.

देव ऐवजी आत्मा शब्द घेतला तर तितकासा आक्षेप राहणार नाही. कारण आपल्या तत्त्वज्ञानात आत्मा या संकल्पनेची अत्यंत तर्कशुद्ध आणि सांगोपांग चर्चा झाली आहे. भक्तीमार्ग हा सामान्यांसाठी आहे.

शिवाय व्यक्तिमत्व म्हणजेच अहंकार या माझ्या विधानाचा लेखमालेत प्रतिवाद झालेला नाही. त्यामुळे व्यक्तिमत्व सुधारून सत्य गवसेल हा दासबोधात सांगितलेला मार्ग फोल आहे. त्यावर तुम्ही  कधी विचार केला आहे  का ?

एक तर रामदास्वामींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी दासबोध ग्रंथ लिहून एक रेघ काढली. तुम्ही ती पुसून टाकण्याऐवजी स्वतःची नवी आणि मोठी रेघ काढा. दुसरे म्हणजे तुम्ही घेतलेल्या आक्षेपांना उत्तर द्यायला रामदासस्वामी येणार नाहीत. 
लेखिकेला तुमच्या आक्षेपांना उत्तर देण्यापेक्षा दासबोधाचे निरूपण करणे जास्त महत्त्वाचे आहे असे दिसते आणि त्यात मला काही गैर दिसत नाही. 

आंतरजालावरचं लेखन हे संवादात्मक  असतं. एकतर्फी लेखन हा आत्मसंवाद असतो आणि ते डायरी सदृश असतं.

इथे आणिदुसऱ्या एका संकेतस्थळावर तुमचे लेखन आणि प्रतिसाद एकतर्फी असल्याचे मला वाटते.

त्यासाठी आंतरजालाचा वापर योग्य नाही असं  वाटतं.

आपण आंतरजालाचे किंवा मनोगताचे मालक नाही. ज्या अर्थी मनोगतावर हे लेखन इतके दिवस सुरू आहे त्या अर्थी मालकांना त्यात आक्षेपार्ह वाटत नाहीसे दिसते.  योग्य अयोग्य त्यांनाच ठरवू द्या.

विनायक