याला अनुवाद म्हणतात. ते लिहीणार्‍याला समजेलं सत्य नाही. अध्यात्मात आतापर्यंत अनेक लोक अशा कामाकत वेळ घालवत आले आहेत.

मी लिहीते आहे तो अनुवाद नाही.  नीट वाचले तर  हे सहजच लक्षात येण्यासारखे आहे.
मी सुरवातीलाच  सांगितले आहे की माझ्या दासबोधवाचनातून, मला झालेले आकलन,  मी माझ्या शब्दात  लिहीते आहे. 
आणि कुणी कशात वेळ घालवावा हा ज्याचा त्याचा  प्रश्न आहे. 

माझे इथे जवळपास ७० लेखप्रकाशित आहेत, जे अध्यात्माचा स्वतंत्र उहापोह करतात आणि ते कशाचाही अनुवाद किंवा निरुपण नाहीत. 
मी तुमच्या या, आणि इतरही  काही संस्थळवरील  वाटचालीशी चांगलीच परिचित  आहे. म्हणूनच तुम्ही काय आणि कसे  लिहीणार याची कल्पना आहे. 

देव ही निव्वळ मानवी कल्पना आहे, तिला काडीचा आधार नाही. तस्मात भक्तीमार्ग हा  करमणूक म्हणून ठीक आहे आणि लेखमालेवरचे माझे प्रतिसाद तेच सांगण्याचा प्रयत्न आहे.

तुम्ही सांगायची गरजच नाही.  समर्थांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि लोकांना समजेल अशा भाषेत सांगितले आहे. या वरूनच लक्षात येते आहे, की  तुम्ही ना दासबोध वाचला आहे, ना माझे लेख. 
 
शिवाय व्यक्तिमत्व म्हणजेच अहंकार या माझ्या विधानाचा लेखमालेत प्रतिवाद झालेला नाही. त्यामुळे व्यक्तिमत्व सुधारून सत्य गवसेल हा दासबोधात सांगितलेला मार्ग फोल आहे. त्यावर तुम्ही  कधी विचार केला आहे  का ? 

तुमच्या विधानांचा प्रतिवाद करणे माझ्या लेखमालेचे उद्दिष्ट्य नव्हे. 

आंतरजालावरचं लेखन हे संवादात्मक  असतं. एकतर्फी लेखन हा आत्मसंवाद असतो आणि ते डायरी सदृश असतं. त्यासाठी आंतरजालाचा वापर योग्य नाही असं  वाटतं. 

तेच मी म्हणते आहे. तुम्ही फक्त तुमचे मनोगत इथे लिहीता आहात.