सत्यम, स्वानंद, मानसी, व जीवन, ही नांवे आहेत त्या मुळे ती मराठीत का इंग्रजीत, असा प्रश्नच येत नाही. पण हॉटेल, एजन्सी, होजिअरी, जनरल स्टोअर्स, कॉटन किंग, लिनन किंग, या शब्दात मराठी कुठे आहे? हे सर्व इंग्रजी शब्द आहेत. केवळ देवनागरी लिपीत लिहिल्याने ते शब्द मराठी होत नाहीत. तसेच, हा सत्कार कोण करीत आहे? तर,स्टेशनरी, कटलरी आणि अँड जनरल र्मचट्स असोसिएशन. फार छान. "कागद, काटे-चमचे, व इतर वस्तू विक्रेता संघटना" नव्हे, तर स्टेशनरी, कटलरी आणि अँड जनरल र्मचट्स असोसिएशन. ही यांची "मराठी" म्हणजे काय याची समज.
पुण्यातल्या मराठी पाट्यां बद्दल तर, "काय म्या बोलावे पामरे" अशी अवस्था आहे. "इथे ताजे दुध मीळेल". हे ही एक वेळ खपवून घेता येईल. पण पुण्यात छपरावर टाकायच्या पत्र्याच्या "शिट" पासून बेड "शिट" पर्यंत सर्व प्रकारची "शिट" मिळते (क्षमस्व, मीळते). पण डिश हा शब्द (तो मराठी नाहीच) हा मात्र हमखास "डीश" असा लिहितात. लहान मुले जसे पायात बूट हमखास चुकिचे घालतात (डाव्या पायात उजवा बूट) तसे पुण्यात र्हस्व/दीर्घ हमखास चुकिचे लिहितात मराठीचा जयजयकार करणाऱ्यांनी आधी तीन गोष्टी कराव्यात.
१- भाषा (मराठी/ इंग्रजी) व लिपी (देवनागरी, रोमन) यातला फरक जाणून घ्यावा
२- व्यापारी संघटांनी आपल्या सदस्यांना र्हस्व/दीर्घ शिकण्या करता मदत करावी, जसे, सायंकालीन वर्ग चालवावेत.
३- व हे होत नाही तो पर्यंत पाट्या रोमन लिपीत लावण्याची सक्ती करावी. जेणे करून "शिट" वीकणे तरि थांबेल.