वाचले, आणि त्यावर प्रतिक्रिया पण लिहीली. तिथेच, खाली कॉमेण्टस मध्ये आहे. आणि कट-पेस्ट करून इथे देत आहे.

तुमची गोष्ट वेगळी आहे हो. सिने सृष्टी/ रंगमंच येथील कलाकारांच्या मुला-मुलींना स्पर्धेला तोंड द्यायचे नसते. आकर्षक व्यक्तिमत्व जनुकीय सूत्रातून मिळालेले असते, व त्याच्या जोरावर ही मुले मुली पण (फक्त) ग्लॅमर क्षेत्रातच करियर करू बघतात. जसे, अभिनय, मॉडेलिंग, फारफार तर फॅशन डिझायनिंग, इत्यादी. एकाद्या नामांकित नट नटी यांच्या मुला-मुलीने, आयआयटी, आयएएस, आयपीएस, एमबीए, मेडिकल, अभियांत्रिकी (स्पर्धेतून तर नाहीच पण डोनेशन देऊन सुद्धा), एनडीए, इत्यादी काही केल्याचे एक तरी उदाहरण आहे ? तर, स्पर्धेत उतरायचेच नसल्याने मराठी का इंग्रजी (किंवा शाळा मधेच सोडली तरी सुद्धा) याने काहीही फरक पडत नाही. म्हणून तुमची व आम्हा सामान्य जणांची तुलना होऊ शकत नाही.