गणितात अपवाद नसतात. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी तिसऱ्या बाजूच्या लांबी पेक्षा जास्त असते. असते म्हणजे असतेच. एक सुद्धा अपवाद नाही. पण सामाजिक विषयातील निष्कर्शांना अपवाद असतात. किंबहुना, फक्त अपवादच असणे (त्यापेक्षा जास्त नाही) याने तो निषकर्श एक प्रकारे सिद्ध होतो.  तर, मन्सूर खान, व इतर ही काही असू शकतात, हे अपवाद आहेत.

मल्लिका साराभाई यांचे उदाहरण चुकिचे आहे. त्या मूळच्या बुद्धीजीवी कुटुंबातल्या, त्यांचे वडील प्रख्यात शास्तज्ञ, व त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केले. (आयआयटी नाही). त्या नंतर त्यांनी काही चित्रपटात काम केले. किती चित्रपट, दोन का पाच, हा मुद्दा नाही. मुद्दा असा, कि हा प्रवास उलट दिशेने आहे. ग्लॅमर-जगाच्या बाहेरील व्यक्तीने आधी उच्च शिक्षण घेतले व मग ग्लॅमर जगात प्रवेश केला. अशी उदाहरणे अनेक जरी नाहीत, तरी आहेत. शेखर कपूर सीए अहेत, मिलिंद गुणाजी इंजिनियर आहेत, जसपाल भट्टी पण इंजिनियर होते, इत्यादी. 
आयआयटी दिल्लीत माझ्याच वर्गात (बी टेक १९७५) एक मुलगा, राजीव चोप्रा, उत्तम मार्क मिळवून बी.टेक. करून झाल्या नंतर त्याने पुण्यातील एफटीआयआय येथे दिग्दर्शन करता प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. (मिळाला नाही, ते एक चांगलेच झाले. अन्यथा वर्षानु-वर्षे संप करण्या व्यतिरिक्त काहीही घडले नसते. आता तो एक यशवी उद्योजक आहे).   

असो. मनोगतच्या होम पेज वर उजवी कडील "रंगलेल्या चर्चा" या मथळ्या खाली यादीत लिहिले आहे "पाहिजे/ मिळेल. बिग बॉस आणि स्वैराचार". हा बिगबॉस आणी स्वैराचार कोणाला पाहिजे आहे ? आणि तो कुठे मिळतो ? (मला नको आहे, पण केवळ कुतुहल म्हणून विचारले).