महाभारत काळात इंटरनेट होते आणि उपग्रहांद्वारे संदेशवहन होते असे त्रिपुराचे मुख्यमंत्री - विप्लवकुमार देव यांनी ठासून सांगितले.
ममता बॅनर्जी या पागल आहेत; त्यांना मानसोपचाराची गरज आहॅे. (त्रिपुराचे मुख्यमंत्री - विप्लवकुमार देव)
(मूळ हैदराबादच्या असलेल्या) डायना हेडन ह्या रंगाने काळ्या आहेत, त्या १९९७ साली जगत् सुंदरी होण्याच्या लायकीची नव्हत्या; त्यांची निवड व्यापारी दृष्टिकोनातून झाली. ऐश्वर्या राय या पूर्णतः भारतीय असल्याने त्या पदाला योग्य होत्या. (त्रिपुराचे मुख्यमंत्री - विप्लवकुमार देव)
प्राचीन काळी माती आणि मेथी ही अनुभवसिद्ध सौंदर्यप्रसाधने होती. (त्रिपुराचे मुख्यमंत्री - विप्लवकुमार देव)
मेकॅनिकल इंजिनिअर्सपेक्षा सिव्हिल इंजिनिअर्स हे सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायला जास्त लायक असतात, म्हणून मेकॅनिकल इंजिनिअर्सनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याच्या फंदात पडू नये. सिव्हिल इंजिनिअर्सना सोसायटी कशी 'बांधतात' याचे ज्ञान असते. (त्रिपुराचे मुख्यमंत्री - विप्लवकुमार देव)
ज्याअर्थी सीतेचा जन्म जमिनीत पुरलेल्या मातीच्या घड्यातून झाला, त्याअर्थी रामायणकाळी टेस्टट्यूब बेबीचे तंत्रज्ञान माहीत होते. सीतेचा जन्म अशाच तंत्रातून झाला. (उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री - भाजप नेता दिनेश शर्मा)
महाभारतकाळी पत्रकारितेची सुरुवात झाली. पौराणिक पात्र ‘संजय’ आणि ‘नारद’ यांना सध्याच्या थेट प्रक्षेपणाशी आणि गुगलशी जोडून पाहिले की हे पटेल. (उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री - भाजप नेता दिनेश शर्मा)
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी, गुरुत्वाकर्षण सिद्धान्त, अॅटम बाॅम्ब आणि इंटरनेटसारख्या तमाम आधुनिक प्रक्रियांची सुरुवात पौराणिक काळीच झाली. (उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री - भाजप नेता दिनेश शर्मा)