मृत्यू देहाला वेदनेपासून कसा मुक्त करतो हे पाहण्याचं कुतूहल, सर्व यातनाच नव्हे तर आत्महत्येच्या विचारावर सुद्धा मात करून जाईल.  एवढंच नाही तर ती  पराकोटीची आध्यात्मिक साधना होईल आणि शेवटच्या क्षणी तरी आपण देह नव्हतो हा उलगडा  होईल.

या वर चार प्रकारे प्रतिक्रिया देता येईल

१ - तुमचा हा अलौकिक उपाय ऋषी-मुनी, देव-गंधर्व - यक्ष, तसेच यंत्र-मानव, यांना (कदचित) करावयास जमेल. पण आम्हा मर्त्य मानवांना कसा जमणार ?
२-  चला, आपण विदर्भात शेतकऱ्यांना "तुम्ही देह नाहीच, नव्हताच" हे शिकविण्याचे क्लासेस काढूया.
३-   कर्ज देणारा, आपले कुटुंबीय आणि आप्तच प्रसंगातून मार्ग काढायला आपल्याबरोबर उभे राहतात    विदर्भात सावकारांना, तसेच बँकांना समजावून सांगूया, कि तुम्ही तुमचे दिलेले कर्ज परत मागणे चूक आहे, व तुम्ही तर कर्जबाजारी शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. त्याला परत या वर्षी पण कर्ज द्या. पुढच्या वर्षी परत त्याच्या बाजूने उभे रहा. आणि दर वर्षी असे करत रहा. (विजय मल्ल्या, नीरव मोदी, यांच्या बाबतीत करताच ना. तसेच).  हीच पराकोटीची आध्यात्मिक साधना  आहे.
४- चूक, पोकळ, आणि भंपक  . . .