किंवा बऱ्याच वेळा नीट न वाचल्यामुळे ही अर्थ समजू शकत नाही.
१. विदेहत्व ही कायम स्थिती आहे. एकहार्टसारख्या दिगज्जनं कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या कित्येकांना, वेदनेपासून अलग होण्याच्या प्रक्रियेमुळे, मृत्यूला साहसानं आणि आनंदानं सामोरं जाण्याचा प्रयोग करून दाखवला आहे. हे सर्व लोक सामान्य होते आणि आहेत. अर्थात, आपण तशा दुर्धर परिस्थितीत नसल्यानं आपल्याला त्याची कल्पना येऊ शकत नाही. पण तो उपाय नक्कीच आहे.
२. शेतकऱ्यांच्या बाबतीतला प्रसंग दैववशात आहे, तो दुर्धर रोगाच्या दैहिक यातनांमुळे नाही; हे नीट वाचल्यास समजू शकलं असतं.
३. कर्ज देणारा, आपले कुटुंबीय किंवा आप्त यापैकी कुणालाही, कर्जदारानं आत्महत्या करावीशी वाटत नसते. कर्जदेणाऱ्याला कर्ज वसुली हवी असते आणि इतर दोघांना आपला माणूस हवा असतो. तस्मात, कर्जदार जगणं दोघांनाही महत्त्वाचं असतं.
४. विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी यांची तुलनाकर्जबाजारी शेतकऱ्याशी होऊ शकत नाही. त्यांची कर्ज हा फ्रॉड आहे आणि शेतकऱ्यांची कर्ज वसूल न होणं ही दुर्घटना आहे. दुर्घटनेवर उपाय होऊ शकतो. फ्रॉड हा गुन्हा आहे, त्याला शिक्षा असते.