"मी कोण" ? विषयी नाही !

तरीही > तुमच्या मते आपण "देह" नाही, व आपण "मनोनिर्मित व्यक्ती" पण नाही. मग "आपण" कोण? त्याचे उत्तर तुम्ही दिलेले नाही

याचं उत्तर शोधायला आध्यात्मिक आकलन हवं आणि ते दुर्मिळ आहे.  स्वतःचाच  प्रतिसाद  वाचा :  तुमचा हा अलौकिक उपाय ऋषी-मुनी, देव-गंधर्व - यक्ष, तसेच यंत्र-मानव, यांना (कदचित) करावयास जमेल. पण आम्हा मर्त्य मानवांना कसा जमणार ?

तस्मात, तो विषय सोडा. 

___________________

माझं साधं म्हणणं असं आहे :

= कोणतीही शारीरिक व्याधी झाली आणि यातना कितीही असहाय्य झाल्या तरी  आपण देहाचा अंत करण्यापेक्षा, मृत्यू देहाला वेदनेपासून कसा मुक्त करतो हे पाहण्याचं कुतूहल, सर्व यातनाच नव्हे तर आत्महत्येच्या विचारावर सुद्धा मात करून जाईल.  

 हा " असहाय्य दैहिक यातनांविषयीचा" दृष्टीकोन आहे.  यातनामय जीवन हे नैराश्याचं कारण होऊन ते आत्महत्येला प्रवृत्त करू शकतं (हिमांशू राय यांचं पुन्हा उदाहरण देतो कारण त्यांची परिस्थिती शेतकऱ्यांपेक्षा वेगळी आहे). एकहार्ट अशाच यातनामय जीवन जगणाऱ्या कॅन्सरग्रस्त व्यक्तींना, विदेहत्त्वाची शिकवण देऊन,  मृत्यूला निर्भयपणे सामोरं नेण्याचं काम करतोयं.

आता थोडा सखोल उलगडा करतो.  मृत्यू सर्वांनाच आहे पण आपण आज मरू, असं शेवटच्या दिवशी सुद्धा कुणाला वाटत नाही किंवा कोणताही दिवस शेवटचा असू शकतो हे सामान्यांना मान्यच होत नाही (ज्यांना ते मान्य होतं ते  अमृताचा शोध घेतात, नीट वाचा अ-मृताचा !  त्याला अध्यात्म म्हटलं आहे).  कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यातल्या व्यक्तीला मृत्यू कधीही येऊ शकतो याची प्रकर्षानं जाणीव होते त्यामुळे त्याला विदेहत्वाचा उलगडा होण्याची शक्यताही जबरदस्त असते. 


२) > विन्सेंट वोन गॉग, अर्नेस्ट हेमिंग्वे, मर्लीन मोनरो, गुरू दत्त, मनमोहन देसाई, दिव्या भारती, . . . भय्यू महराज, यांना कोणत्याही दुर्धर व्याधीने ग्रासलेले नव्हते; ते कर्जबाजारी नव्हते; व त्यांच्या स्वप्रतिमेचा बोजवारा उडावा असे काहीही घडलेले नव्हते. सर्वच लोकप्रीयतेच्या शिखरा वर होते. या सर्वांना घोर नैराश्याने ग्रासलेले होते

आता चर्चा योग्य वळणावर आली ! नैराश्य  हे आत्महत्येचं कारण असलं तरी मुळात तो "परिणाम" आहे. तस्मात, नैराश्याचं कारण काय ?  ते शोधायला हवं.   तुमच्यासाठी याचा मानशास्त्रिय उलगडा करतो.  आपला सहवास आपल्याला असहाय्य होणं  ही आत्महत्येला कारणीभूत होणारी मनस्थिती आहे. मग या अवस्थेप्रत न्यायला कुणाला प्रेमभंग, कुणाला कर्जबाजारीपणा,  कुणाला अपयशाची भीती तर कुणाला प्रतिमा हननाची दहशत वाटू शकते. थोडक्यात काय, तर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या लेखी त्यानंच निर्माण केलेल्या  "स्वप्रतिमेचा बोजवारा उडालेला असतो".  त्यामुळे व्यक्तीला स्वतःचा सहवास असहाय्य होतो आणि स्वतःला  संपवण्याची इच्छा होते.

आता तुम्हाला थोडं फार कळू शकेल. वॅन गॉग, हेमिंग्वे, मर्लिन, गुरू दत्त,  मनमोहन देसाई , दिव्या;  दुनियेला लाख मोलाचे वाटत असतील पण खुद्द त्यांना स्वतःविषयी कमालीचा तिरस्कार निर्माण झालेला असतो. आणि त्याही पुढे जाऊन एखादा शेतकरी  जगाच्या खिजगणतीतही नसतो पण त्याचीही नेमकी तीच परिस्थिती झालेली असते. आधीच्या व्यक्ती स्वत:च्या  मनस्थितीला स्वतः जवाबदार असतात तर शेतकरी दैववशात परिस्थितीत सापडलेला असतो.  

त्यामुळे अशा कोणत्याही व्यक्तीनं  स्वतःच्या हातानी स्वतःच्या प्रतिमेचा बोजवारा उडवून घेतला; थोडक्यात,  "मी नालायक आहे, माझ्या जगण्याला काही अर्थ नाही  आणि मी आत्महत्या करणार आहे" असं  जगजाहीर केलं की झालं ! सगळे त्याला सावरायला पुढे येतील आणि आत्महत्त्या होणार नाही.

आता मी काय म्हणतो याचा  थोडा बहुत प्रकाश तुम्हाला पडू शकेल. स्वतःला व्यक्ती समजणं हाच मूळ पेच आहे. दैहिक यातनेत व्यक्ती देह संपवते आणि मानसिक गर्तेत व्यक्तिमत्त्व संपवते.