दिल्लीचे मुख्यमंत्री लेफ्टनंट गव्हर्नरच्या कार्यालयात धरणे धरून बसले आहेत, भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या घरात धरणे धरताहेत, दिल्लीतले आयएएस अधिकारी प्रेस कॉन्फरन्स करत आहेत; या अदाधुंदीवर पंतप्रधान मात्र डोळे मिटून स्वस्थ बसले आहेत. (राहुल गांधी)
'राहुल गांधी फारच मोठे यंत्रज्ञ आहेत, जेव्हातेव्हा यंत्राच्या गोष्टी करतात.' महू येथे झालेल्या एका सभेत ते म्हणाले, 'असे मशीन बनवू की ज्यात वरून बटाटे टाकले की खालून सोने बाहेर पडेल. मंदसौरच्या सभेत राहुल गांधी म्हणाले की, 'असे यंत्र बनवू की ते आठ दिवसांत कर्ज खतम करेल. '
आम्ही या यंत्रांची वाट पाहत आहोत. (भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय)