प्रतिसादात तुम्ही नैराश्यानं येणाऱ्या अनिर्णायक अवस्थेबद्दल बोलतायं; पण आत्महत्या हा (पराकोटीचा असला तरी) ठाम व्यक्तिगत निर्णय असतो, बहुदा तुमच्या लक्षात आलेलं नाही. तुमच्या प्रतिसादाची दिशा चुकण्याचं कारण म्हणजे मित्राच्या अनिर्णायक आणि नेगटीव मानसिक स्थितीचा संबंध आत्महत्येशी जोडण्याचा तुमचा प्रयत्न. असा एकदर्शी चष्मा घातल्यानं, आत्महत्येला कारणीभूत होणारी मानसिक अवस्था (स्वत:चा सहवास असहाय्य होणं), तुम्हाला कळलेला नाही आणि त्यामुळे प्रतिसाद भरकटत चालले आहेत.
अंत:स्त्रावातील बिघाडामुळे दोलायनमान झालेली अवस्था मानसोपचारातील औषधांनी दुरुस्त होईल (किंवा नाही) पण तिचा आत्महत्येशी सरळ संबंध नाही. ज्या घटनेवरुन या चर्चेला सुरुवात झाली ते भय्यू महाराज अशा मेंदूतल्या रासायनिक बिघाडांनी ग्रस्त नव्हते किंवा कर्जबाजारी शेतकरीही अशा व्याधीनी ग्रस्त नसतो. शिवाय हिमांशू राय यांनी तर सरळसरळ कॅन्सरच्या यातनांना कंटाळून आत्महत्या केली आहे.
तुमच्या मित्राला मनोविकारिक औषधोपचारांची गरज आहे. ज्या विषयावर चर्चा चालू आहे, त्या मानसिक गर्तेत सापडलेल्या व्यक्तींच्या मेंदूत रासायनिक बदल घडलेला असेलच असं नाही, त्यामुळे त्यांना दृष्टीकोन बदलण्याची गरज असते.
.