मित्राच्या अनिर्णायक आणि नेगटीव मानसिक स्थितीचा संबंध आत्महत्येशी जोडण्याचा तुमचा प्रयत्न.
हा माझा प्रयत्न नाही, आणि  हा माझा प्रयत्न नाही. मी जे काही लिहिले, ते प्रस्थापित सायकियाट्री सांगते. गूगल मध्ये "मेन कॉसेस ऑफ सुईसाईड" असे शोध करा. किंवा ही वेबसाईट बघा. पहिलाच परिच्छेद वाचा. "आत्महत्या करणाऱ्या पैकी नव्वद टक्के लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक रोगाने ग्रस्त असतात. नैराश्य हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्या नंतर बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, इत्यादी"  (मराठीत अनुवाद करून लिहिले).

अंत:स्त्रावातील बिघाडामुळे दोलायनमान झालेली अवस्था मानसोपचारातील औषधांनी दुरुस्त होईल (किंवा नाही) पण तिचा आत्महत्येशी सरळ संबंध नाही.

कर्जबाजारी अवस्था, नाते-संबंध हाताळता न येणे, ही कारणे पण आहेत, पण ती फक्त दहा टक्के. तुम्ही त्या दहा टक्क्यांचे विश्लेषण करत आहात असे नमूद केले असते, तर हा सर्व लेखन प्रपंच झालाच नसता. पण डिप्रेशनचा आत्महत्येशी सरळ संबंध नाही,  हे अगदी नवीन व क्रांतिकारी संशोधन तर आहेच, पण प्रस्थापित सायकियाट्रीला शीर्षासन अवस्थेत नेणारे आहे. पण इथे म्हणजे मनोगत वर त्याची योग्य ती दखल घेतली जाणार नाही. एकाद्या मानसशास्त्र जर्नल कडे शोध-निबंध पाठवून द्या, तिथे तुमच्या संशोधनाचे चीज होईल. माझ्या शुभेच्छा.