आता तरी नीट वाचा. वर प्रतिसादात मी म्हटलं आहे :

नैराश्य हे आत्महत्येचं कारण असलं तरी मुळात तो "परिणाम" आहे. तस्मात, नैराश्याचं कारण काय ?  ते शोधायला हवं.  

भैय्यू महाराजांची सुसाईड नोट वाचलीत का ? 

तीचा मराठी अनुवाद असा आहे :

" कुणी तरी (माझ्या) कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. मी निघालोय.
 (मला  ) अत्यंत तणाव आहे (टू मच स्ट्रेस्ड आऊट),  (सगळं) नकोसं झालं आहे (फेड अप) . "


कुठे आहे यात  बायपोलर किंवा स्किझो ?  नैराश्य आहे पण  तुम्ही म्हणता तशी मानसिक व्याधी नाही. या अवस्थेला स्वतःचा सहवास असहाय्य होणं म्हणतात.  कळतंय का ? 

शिवाय शेतकऱ्याला कुठली बायपोलर असते, ते तुमच्या अफाट व्यासंगातून  लिहू शकाल  का ?  तिथे तर केवळ  आर्थिक मुद्दा असतो. कर्जाचा मुद्दा सुटला तर शेतकरी कशाला आत्महत्या करेल ? येतंय का लक्षात ? 


आधीच्या प्रतिसादात  तुम्ही अनिर्णायक अवस्थेचा (झोंबी  स्टेट) आत्महत्येशी संबंध जोडला होता. पण झोंबी कोणताच निर्णय घेऊ शकत  नाही हे लक्षात आल्यावर, आता बायपोलर आणि स्किझोकडे गाडी वळवली आहे. जास्त वाचन  केलं  की त्याचं नको तिथे  ऍप्लिकेशन होतं असा प्रकार होतोयं तुमचा. 

पुन्हा एकदा नीट वाचा म्हणजे मुद्दा समजेल :

बायपोलर किंवा स्किझोफ्रेनिया मानसोपचार आणि औषधानी बरा होऊ शकतो आणि त्यातून येणार्‍या नैराश्याचं निराकरण होऊ शकतं. पण तो चर्चेचा विषय नाही. सांप्रत चर्चा ही आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या व्यक्तीला त्यापासून विन्मुख कसं करता येईल यावर चालू आहे.