श्री. विनायक,

प्राप्तिकर बुडवून, राष्ट्राचे नुकसान करून गब्बर झालेल्या लोकांमध्ये आपण सत्यजित रे यांचा समावेश कसा करता ? इतर दोघे बहुतेक त्यापैकी असावेत. 

प्राप्तिकराचा मुद्दा गौण आहे. आणि माझ्या प्रतिसादात मी सरसकट केलेले विधान गैर होते, हे मला प्रतिसाद सुपूर्त करताच जाणवले. मी माझे विधान मागे घेतो.

तसं पहाता, सत्यजित रे, संजय लिला भन्साळी, गोवारीकर ह्यानी प्राप्तिकर भरला किंवा नाही ह्याची मला कल्पना नाही. बर्‍याच गब्बर चित्रपट निर्मात्यांची नांवे खुप वेळा प्राप्तिकर बुडविणार्‍यांच्या यादीत दिसतात म्हणून लिहीले गेले. असो.

'श्वास'कार अजून तरी मध्यमवर्गीय आहेत. 'इन्कमच नाही तर टॅक्स काय भरणार' असे सखेद प्रतिपादन करणार्‍या वर्गातले. त्यामुळे अजून तरी निष्पाप आहेत. पुढे चुकून-माकून गब्बर झालेच तर प्राप्तिकर बुडविणारच नाहीत असं छातिठोक सांगता येणार नाही. असो.

मी श्वास पाहिला नाही. पण तो कैरी, ध्यासपर्व, यांच्या तोडीचा असेल याबद्दल शंका आहे.

चित्रपट 'चांगला' की 'सुमार' हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे. मला आवडला म्हणजे इतरांनाही तो आवडावा असा माझा अट्टाहास नाही. पण ५० वर्षांनंतर मराठी चित्रपटाला 'सुवर्णकमळ' सन्मान प्राप्त झाला आहे तर त्या बद्दल सर्वांनी चांगलेच बोलावे ही भावना. 'वचनेन किंम दरिद्रता?'

धन्यवाद.