पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आवर्जुन छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घालून सन्मान केला आणि यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात फुले पगडी घालण्याचा सल्ला दिल्ला

प्रतिक्रिया :-

बारामतीकरांना कोणती पगडी कधी वापरायची हे चांगलं माहीत असले तरी जनतेलाही तुम्हाला कोणती पगडी घालायची हे चांगले माहीत आहे. (बारामतीतील पत्रकार परिषदेदरम्यान राज्याचे दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर)

पुणेरी पगडी घालायला विद्वत्ता असायला हवी.

पगडी बदलाल..सडक्या मेंदूचे काय?

मुळात पुणेरी पगडी हा प्रकार अभिजन नाही. या पगडीला सामान्यतः गोपाळ कृष्ण गोखले पगडी असे म्हणतात. ह्या पगडीचा त्याग म्हणजे गोखले यांच्या विचारांचा त्याग आहे. गोखले हे काँग्रेसचे एक प्रमुख मवाळ नेते होते.. काँग्रेसला बुद्धिमत्ता पुरविण्याचे काम ज्यांनी ज्यांनी केले त्यात गोपाळ कृष्ण गोखले हे आघाडीचे नाव आहे. भारतीय संसदीय परंपरेत अर्थसंकल्पावरची भाषणे, सरकारवर विधायक टीका, क्वचित प्रसंगी संसदेत सभात्याग या लोकशाहीच्या परंपरा गोखल्यांनीच सुरू केल्या. आज पवारांना त्यांची पगडी खटकली यावरून पवारांची लोकशाहीप्रती आणि मूळच्या काँग्रेसप्रती असलेली 'श्रद्धा'च दिसून येते.

बुडत्याला फुले पगडीचा आधार!

सायबी टोपी घाला,हॅट घाला अथवा काहीही घाला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. (खासदार राजू शेट्टी)

पगड्यांमधून तुम्ही राजकारण करीत आहात, मराठी माणूस तुम्हाला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही.राजकारण करायचे असल्यास डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या वापरू नका. पगड्यांमुळे लोक प्रसिद्ध झाले नाहीत तर त्या लोकांमुळे पगड्या प्रसिद्ध झाल्या.लोकमान्य टिळक, महात्मा फुले ही महाराष्ट्राने दिलेली रत्ने आहेत (उद्धव ठाकरे)