'माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली', असे वक्तव्य करून वादाची राळ उडविणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना आरोग्य विभागाच्या आदेशानुसार नाशिक महानगरपालिकने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भिडे यांच्याविरोधातील कारवाईसंदर्भात ही नोटीस असली, तरी ती आंब्याची झाडे किती आणि कुठे आहेत, तुम्ही दिलेले आंबे खाल्ल्याने ज्या दांपत्यांना मुलगे झाले, त्यांची नावे व पत्ते द्यावेत, असे त्यात म्हटले आहे. सात दिवसांच्या आत भिडे यांना त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. (संभाजी भिडे यांना नाशिक महापालिकेची नोटीस, १८ जून २०१८)