मध्यप्रदेशचे विधानसभा अध्यक्ष डॉ. सीताशरण शर्मा यांनी हुशंगाबाद येथे ५९,००० चौरस फूट सरकारी जमीन बळकावून तेथे एक शाळा बांधली आहे. त्या जमिनीवर काही दुकानेसुद्धा आहेत.  या गोष्टी ताबडतोब हटवून जमीन ताब्यात घ्यावी. गेल्या काही दिवसात या जमिनीपासून सीताशरण शर्मा यांना दोन अब्ज रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. ही रक्कम लगेच सरकारी तिजोरीत भरावी. (मध्यप्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता मानक अग्रवाल)

 प्रतिसाद : 
मी फक्त गेल्या साडेचार वर्षांपासून विधानसभेचा अध्यक्ष आहे. ही शाळा सन १९५६पासून आहे. गेल्या ५५ वर्षांपासून  हुशंगाबादचे आजी-माजी कलेक्टर त्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष आहेत.

त्या जमिनीवरची ५६ दुकाने विकली तरी दोन अब्ज रुपये येणार नाहीत.  काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नाहीत म्हणून ते असली खोटीनाटी विधाने करत असतात. (मध्यप्रदेशचे विधानसभा अध्यक्ष डॉ. सीताशरण शर्मा)