प्रो. साईबाबा व त्याच्या इतर साथीदारांना देशविघातक कारवाया केल्याच्या आरोपावरून गडचिरोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असताना, साईबाबाने हायकोर्टात दाखल केलेल्या अर्जात 'नागपूरच्या कारागृहात आवश्यक असणाऱ्या सुविधा नाहीत, असा दावा केला आहे.  त्याला व्हीलचेअरची गरज आहे. परंतु, कारागृहातील जमीन ही सपाट नाही. त्यामुळे व्हीलचेअर चालवता येत नाही, असे अर्जात नमूद केले आहे. याशिवाय त्याला ग्लॅडर स्टोनचा आजार असून त्यासाठी दिल्लीतील खासगी डॉक्टरमार्फत उपचार करण्याची परवानगी द्यावी', अशी विनंती न्यायालयाला केली आहे.' त्यासाठी जामीन देण्यात यावा,' अशीही मागणी करण्यात आली आहे.