नवी मुंबईतील सिडकोची २४ एकर जमीन कोयना प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली
खासगी बिल्डरला देण्यात १७६७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, यात थेट
मुख्यमंत्र्यांचा हात आहे।। (मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते
रणदीप सुरजेवाला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण)
कोयनेच्या आठ धरणग्रस्तांना ही २४ एकर जमीन दिल्यानंतर दोन महिन्यांनी एकाच
दिवशी या जमिनीतील नावांचे फेरफार, त्याचे हस्तांतरण व त्याचे
मुखत्यारपत्र एकाच दिवशी भतिजा बिल्डरच्या नावावर केले गेले. १७६७ कोटी
रुपयांची ही जमीन अवघ्या ३ कोटी ६० लाखांना बिल्डरला देण्यात आली. यामागे
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार प्रसाद लाड व बिल्डर भतिजा यांचे
व्यवसायिक संबंध अाहैत। ( संजय निरुपम)
प्रतिक्रिया :- मुळात ही २४ एकर जमीन कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आली आहे.
सर्व्हे नंबर १८३ ओवे नवी मुंबई येथील ही जमीन असून, ती वाटप करण्याचा
अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. या जमिनीचे वाटप २६ फेब्रुवारी २०१८ रोजी
नियमात राहून जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्या निर्णयात मुख्यमंत्री किंवा
मुख्यमंत्री कार्यालयाचा काहीही संबंध नाही. प्रकल्पग्रस्तांना दिलेली
जमीन ही शेतजमीन आहे. त्याची रेडीरेकनरनुसार किंमत पाच कोटी २९ लाख आहे.
काँग्रेसला एफएसआयची भाषा कळते. त्यामुळे शेतजमीन चौ. फुटात सांगण्याचा
प्रयत्न त्यांनी केला. ( भांडारी)