मुंबईतील अंधेरी येथे पादचारी पुलाचा भाग ट्रॅकवर कोसळून झालेल्या
दुर्घटनेवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणले, 'मुंबईतील नागरी प्रशासनच कोसळलं आहे',
प्रतिक्रिया : अपघात, बलात्कार, दंगली, हिंसाचार, देशाची सुरक्षा, देशाची प्रतिमा,
अतिरेकी हल्ले, जवानांची जवाबी कारवाई, महिलांवरील अत्याचार, खून, नैसर्गिक
आपत्ती, मारामारी, आत्महत्या, दुर्घटना अशा कोणत्याही मुद्यावर पक्षीय
स्वार्थाचे राजकारण करतांना या राजकारणी नेत्यांना शरम कशी ती वाटत नाही.